लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: पत्नीला हिटरने चटके देऊन पतीने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीवर अत्याचार करणाऱ्या पतीच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय पतीला अटक केली आहे. पत्नीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा… अपघातात अपंगत्व आलेल्या महिलेची न्यायाधीशांनी घेतली प्रत्यक्ष भेट, दिली ४७ लाख ९० हजारांची नुकसान भरपाई

फिर्यादी महिलेला चार मुले आहेत. पत्नीच्या हातात मुलीचा मोबाइल संच पाहिल्याने आरोपी पती चिडला. पत्नीवर संशय घेऊन त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला पाणी गरम करण्याच्या हिटरने चटके दिले.

हेही वाचा… “मला बोलावण्याची गरज वाटली नसेल…” जयंत पाटील यांचा नाराजीचा सूर

आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुले रडायला लागली. तेव्हा आरोपीने मुलांना घराबाहेर काढले. पत्नीला चटके दिल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिला स्वयंपाक घरातील खलबत्याने मारहाण केली. पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन त्याने मुलांची जबाबदारी झटकली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने पोलिसांकडे तक्रार दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune city husband arrested by kondhwa police after husband raped his wife by hitting her with a heater pune print news rbk25 dvr