पुणे : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. पुढील आठवड्यात या नगरसेवकांबरोबर काही पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याने पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या भाजप, शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मोठे यश मिळाले. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला पराभवाचा मोठा धक्का बसला. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वरिष्ठांकडून पक्ष वाढीसाठी कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप करून दोन माजी नगरसेवकांनी पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे.

Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Uddhav Raj Thackeray meet at family function Mumbai news
उद्धव- राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण; कौटुंबिक कार्यक्रमात भेट
Raj Thackeray and Uddhav Thackeray Came Together
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
Vijay Wadettiwar On Bmc Election 2025
Vijay Wadettiwar : ‘मविआ’त बिघाडी? महापालिकेच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे स्वबळाचे संकेत; वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यांच्या पक्षाची…’
शहांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद
Raj Thackeray On kalyan society dispute
Kalyan Society Dispute : कल्याण मारहाण प्रकरणावर राज ठाकरेंची संतप्त पोस्ट; सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत म्हणाले, “मारहाण झाली त्याची आई-बायको…”
Aditya Thackeray criticizes Amit Shah,
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”

हे ही वाचा… नववर्षाच्या मध्यरात्री पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा, शनिवार पेठ पोलीस चौकीत तरुणाचा गोंधळ

शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन आठ माजी नगरसेवकांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातील पाच जण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामध्ये माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल यांच्यासह तीन नगरसेविका आहेत. हे पाचजण भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. त्यांपैकी धनवडे आणि ओसवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.

पुण्यात शिवसेनेला (ठाकरे) कोणीही वाली नाही. जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नकोय असे वाटायला लागले. ना लोकसभेला जागा, ना विधानसभेला. जागा मिळाली, तरी उमेदवाराच्या मागे कोणतीही ताकद द्यायची नाही, कोणतीही रसद पुरवायची नाही. ना कोणत्या शिवसैनिकाला मदत करायची. शिवसैनिकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे नाही. ज्यांना पक्ष वाढविण्याची भूक आहे, त्याला काम करू न देणे हे गेली पाच वर्षे सुरू आहे. पक्षात जे नगरसेवक आहेत ते पक्ष वाढवायचे सोडून केवळ पायात पाय घालण्याचे काम चालू आहे. पक्ष वाढविण्याासाठी पाच वर्षात एकही बैठक झाली नाही, असा आरोप धनवडे यांनी करत पक्ष सोडणार असल्याचे जाहीर केले आहे.

हे ही वाचा… ‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी

दरम्यान, ओसवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आता तरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई सोडून इतर ठिकाणी पहावे, असे म्हणत लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाच माजी नगरसेवकांसह अन्य काही पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाला धक्का मानला जात आहे.

पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही. पक्ष वाढविण्यासाठी खूप कष्ट घेतले. जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नको आहे, असे वाटत आहे. शिवसेनेने खूप प्रेम दिले, ती सोडताना खूप त्रास होत आहे. पण निर्णय हा घ्यावा लागतो. माझ्यासह अजून काही पदाधिकारीदेखील शिवसेना सोडण्याचा निर्णय लवकरच घेतील, असे माजी नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले.

Story img Loader