पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त गुरुवारी (२६ सप्टेंबर) दुपारनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते सारसबाग, टिळक रस्त्यावरील पूरम चौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सिंहगड रस्त्यावरुन स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौकमार्गे इच्छित स्थळी जावे. मित्रमंडळ चौकातून स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून डावीकडे वळून सिंहगड रस्ता चौकातून इच्छितस्थळी जावे. देशभक्त केशवराव जेधे चौकातून सातारा रस्त्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जेधे चौकातून सातारा रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी जेधे चैाकातून डावीकडे वळून शंकरशेठ रस्त्याने सेव्हन लव्हज चौकात यावे. गुलटेकडी, वखार महामंडळ चौक, मार्केट यार्डमार्गे सातारा रस्त्याकडे यावे. शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकातून जेधे चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहनचालकांनी गुलटेकडी, मार्केट यार्डमार्गे इच्छितस्थळी जावे.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे

शिवाजीनगर न्यायालय परिसरात बदल

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील रानडे पथ (कामगार पुतळा ते शिवाजी चौक) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी कामगार पुतळामार्गे मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात यावे. शिवाजी चौकातून जाणाऱ्या वाहनांनी मंगला चित्रपटगृहमार्गे काँग्रेस भवनमार्गे इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगर येथील तोफखाना चौक ते शिवाजीनगर न्यायालय रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

हे ही वाचा… पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना उद्या मुसळधार पावसाचा इशाऱ्यामुळे सुट्टी

नीलायम चित्रपटगृह चौकात वाहने उभी करण्यास मनाई

सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून वाहनचालकांनी नीलायम चित्रपटगृह पूल परिसरातून डावीकडे वळून सिंहगड रस्त्याने इच्छित स्थळी जावे. बाबुराव घुले पथ परिसरातून टिळक आयुर्वेद महाविद्यालय, तसेच आंबील ओढा चाैकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहनचालकांनी जाॅगर्स पार्क परिसरातून शास्त्री रस्त्याकडे यावे. साने गुरुजी पथ, नीलायम चित्रपटगृह चौक परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

१२ ठिकाणी वाहनव्यवस्था

वाहने लावण्यासाठी १२ ठिकाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सभेसाठी बसमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दांडेकर पूल, नीलायम पूल, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा ते नीलायम चित्रपटगृह, नाथ पै चौक ते अलका चित्रपटगृह चौक, न्यू इंग्लिश स्कूल ते विसावा मारुती चौक, सणस पुतळा ते पूरम चौक, अलका चित्रपटगृह ते भिडे पूल येथे सोडावे.

हे ही वाचा… पंतप्रधानांच्या सभास्थळी चिखल, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी; जेसीबीच्या साहाय्याने खडी टाकून…

वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे – भिडे पूल नदीपात्र, (पूरस्थिती विचारात घेऊन), नीलायम चित्रपटगृहाचे आवार, मित्रमंडळ चौक, पाटील प्लाझा, विमलाबाई गरवारे प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, म्हात्रे पुलाजवळ डी .पी .रस्ता , कटारिय हायस्कूल, गुलटेकडी, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, मिनर्व्हा चित्रपटगृह वाहनतळ, मंडई, हरजीवन रुग्णालय, सारसबाग, हमालवाडा, नारायण पेठ, पीएमपीएल मैदान, पूरम चौक