पुणे : शहरात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. नारायण पेठेतील अष्टभुजा मंदिराजवळ नदीपात्रात गुरुवारी सकाळी पोहण्यासाठी उतरलेला तरुण वाहून गेला. कात्रज येथील आंबील ओढा परिसरात मासे पकडण्यासाठी गेल्याची सायंकाळी घडली. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. नारायण पेठेतील अष्टभुजा मंदिर परिसरातील नदीपात्राजवळ मुठेला आलेला पूर पाहण्यासाठी गर्दी झाली होती. त्यावेळी एक तरुण पळत नदीपात्राकडे गेला. त्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत उडी मारली. काही वेळ तो पाेहला. त्यानंतर तो वाहून गेला. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली, अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा: राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ६७६ टीएमसी, गेल्या पाच दिवसांत १४८ टीएमसीने वाढ

वाहून गेलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. तो नारायण पेठेतील एका खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानात कामाला होता. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा खाद्यपदार्थ दुकान बंद होते. वाहून गेलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही, असे त्यांनी सांगितले. कात्रज परिसरातील लेकटाऊन सोसायटीजवळ असलेल्या आंबील ओढ्यात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण वाहून गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. अक्षय संदेश साळुंके (वय २६, सध्या रा. अप्पर इंदिरानगर, मूळ रा. सांगली) असे वाहून गेलेल्याचे नाव आहे. तीन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आंबील ओढ्याला पूर आला आहे. लेकटाऊन सोसायटीजवळ असलेल्या आंबील ओढा परिसरात गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अक्षय मासे पकडण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा शोध घेतला. मात्र, अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.