पुणे : पुण्यातील बिबवेवाडी भागातील शंकर महाराज मठ येथे केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे आज सकाळी दर्शनासाठी आले होते. त्यावेळी भाजपच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
हेही वाचा : पुणे: वाद मिटवण्यासाठी बोलवून तरुणीला मारहाण; तीन मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
या घटनेबाबत भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, शंकर महाराज मंदिरात गर्दी झाली होती. त्यावेळी आत जाण्यावरून त्या ठिकाणी वाद झाल्याची घटना घडली.
पुण्यातील शंकर महाराज मठ येथे केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे आज सकाळी दर्शनासाठी आले होते. त्यावेळी भाजपच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. pic.twitter.com/ZMen6Rb5Bn
— LoksattaLive (@LoksattaLive) June 20, 2024
त्यावेळी नेमके कोण कार्यकर्ते होते याबद्दल माहिती नाही. भाजपच्या दोन गटात हाणामारी नसल्याचे सांगत सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
© The Indian Express (P) Ltd