पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा प्रवाह कायम असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंड वातावरण कायम राहणार आहे. मात्र, दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे बुधवारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेतील कमोरीयन भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहे. या वाऱ्यामुळे गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात २१ डिसेंबरनंतर वाढ होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : अपघातातील वाहन परत देण्यासाठी मागितली दीड लाखांची लाच; सहायक फौजदार गजाआड, पिंपरीतील चिखली पोलीस ठाण्यात ‘एसीबी’ची कारवाई

rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Temperature maharashtra, climate change,
थंडी आणखी दोन दिवस; पुन्हा तापमान वाढणार, जाणून घ्या हवामानातील बदल कशामुळे
Large fluctuations in weather in Gondia state
महाराष्ट्राच्या सीमेवरील या शहरात सर्वाधिक थंडी…पारा तब्बल…
Minimum temperature in Mumbai , Mumbai temperature drops ,
मुंबईतील किमान तापमानात ४ अंशांनी घट

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कायम आहे. मध्य प्रदेश मार्गे थंड वारे राज्यात येत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे. राज्याच्या बहुतेक भागात रात्री उशिरा किंवा पहाटे धुके पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

Story img Loader