पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा प्रवाह कायम असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंड वातावरण कायम राहणार आहे. मात्र, दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे बुधवारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेतील कमोरीयन भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहे. या वाऱ्यामुळे गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात २१ डिसेंबरनंतर वाढ होण्याचा अंदाज आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in