राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ राज्ययभरात विविध संघटना आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसने देखील आंदोलन केलं. पुण्यात आज माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे शहाराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या वेळी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी राज्यपाला कोश्यारी यांच्या पोस्टरला जोडे मारले आणि त्यानंतर ते पोस्टर जाळून निषेध नोंदवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वेळी रमेश बागवे म्हणाले की, भाजपा नेत्यांनीकडून मागील काही दिवसांत वेळोवेळी वादग्रस्त विधानं करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले गेले आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे विधान केलं आहे, त्यातून भाजपाची वृत्ती दिसून येते. त्या विधानाचा आम्ही निषेध करतो. तसेच, कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल वाटत नाहीत, तर भाजपाचे राज्यपाल असल्यासारखे त्यांनी काम केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारींनी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ; पुणे महापालिकेत आंदोलन!

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना, महाराष्ट्रामधून करोना पसरला असल्याचं म्हटलं होतं. या विधानाचा देखील आम्ही निषेध करीत आहोत, आता सहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोघे पुण्यात येणार आहेत. आम्ही त्यांना विरोध करणार असून गो बॅक मोदी, गो बॅक कोश्यारी असे आम्ही आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.