पुणे : ज्येष्ठ नागरिकास दिलेले धनादेश न वटल्या प्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाला न्यायालयाने सहा महिने कारावास आणि वीस लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी याबाबतचे आदेश दिले. विकास चव्हाण असे शिक्षा सुनावलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत सुधीरसिंग माधवसिंग परदेशी यांनी तक्रार दिली होती. परदेशी कसबा पेठेत राहायला आहेत. सदनिका खरेदी व्यवहारात परदेशी यांनी २००६ पासून २०१६ पर्यंत साईनाथ असोसिएटकडे अकरा लाख रुपये जमा केले. मात्र, बांधकाम व्यावसायिक चव्हाण यांनी परदेशी यांना सदनिका दिली नाही.

हेही वाचा : योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या एकाचा जामीन फेटाळला, महिला पोलिसाला शिवीगाळ

२०१७ मध्ये पैशांची परतफेडी करण्यासाठी दोन धनादेश दिले. परदेशी यांनी धनादेश बँके खात्यात जमा केले. मात्र, धनादेश वटले नाहीत. त्यानंतर परदेशी यांनी ॲड. बिलाल शेख यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेऊन फौजदारी तक्रार दाखल केली. ॲड. शेख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने शिक्षा सुनावली. ॲड. शेख यांना ॲड. वसीम पठाण आणि ॲड. केदार खोपडे यांनी सहाय केले.

Story img Loader