पुणे : बीड, अहमदनगर जिल्ह्यात दरोडा घालून पसार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने पकडले. याप्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले.
रोहित गुरुदत्त वाघमारे (वय २९, रा. माळी चिंचोरा, ता. नेवासा, जि. अहमदनगर, सध्या रा. वारजे माळवाडी), शुभम चांगदेव धनवटे (वय २०, रा. वडाळा महादेव, जि. अहमदनगर, सध्या रा. उत्तमनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. बीडमधील अंभोरा आणि नगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा घालण्यात आल्याचे गु्न्हे दाखल झाले होते.
हेही वाचा…२४ तारखेला आमचा मुख्यमंत्री शपथ घेईल; चंद्रकांत पाटील
u
वाघमारे, धनवटे आणि अल्पवयीनाने दरोडा घातला होता. गु्न्हा केल्यानंतर तिघे जण पसार झाले होते. ते पुण्यात वास्तव्यास होते. तिघे जण एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात थांबल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक शाहिद शेख, हवालदार धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, अजित शिंदे यांनी ही कारवाई केली. तिघांना अंभाेरा आणि पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.