पुणे : कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढीस लागली आहेत. पोलीस असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून ७० लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने चोरून नेल्याचे उघडकीस आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार पाषाण भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी सप्टेंबर महिन्यात त्यांना समाज माध्यमातून संदेश पाठविला होता. चोरट्याने त्यांच्यााकडे पोलीस असल्याची बतावणी केली होती. चोरट्यांनी त्यांना पोलीस दलातील बनावट ओळखपत्र पाठविले. तुमच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचे व्यवहार झाले आहेत. याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हा दाखल न करणे, तसेच तपासात मदत करण्याासाठी चोरट्याने तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी बतावणी केली. चोरट्याने त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्याने खात्यातून ४५ लाख रुपये चोरून नेले.

हेही वाचा…पुणे : राहुल गांधी यांच्या हजेरीसाठी पतियाळा न्यायालयामार्फत समन्स, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य

दुसऱ्या एका घटनेत टिळक रस्ता भागातील एका ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची चोरट्यांनी फसवणूक केली आहे. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन चोरट्यांनी २५ लाख ४० हजार रुपये चोरले. चोरट्याने वेगवेगळ्या बँक खात्यात चोरलेली रक्कम हस्तांतरित केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांनी बतावणी करुन नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune cyber thieves stole 70 lakh from two senior citizens by impersonating police in separate incidents pune print news rbk 25 sud 02