पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य शुक्रवारी दाखविण्यात आला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.

गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. या सजावटीचे आणि गणरायाचे छायाचित्र गणेशभक्तांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले. देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.

हेही वाचा : विकास करण्यासाठी महायुतीत, मी सत्तेला हापापलेलो नाही; सत्ता येते, सत्ता जाते – अजित पवार

मंदिरात पहाटे प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा अर्पण केली. सूक्त पठण आणि अभिषेक करण्यात आला. आंब्याची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

Story img Loader