पुणे : सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल आणि संगमवाडी यथील बिंदूमाधव ठाकरे चौकात ग्रेड सेपटरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याच्या अनुषंगाने सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत त्यावर निर्णय अपेक्षित आहे.
सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल, संगमवाडीतील बिंदूमाधव ठाकरे चौक आणि येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल-ग्रेडसेपरेटर बांधण्याचे महापालिकेने जाहीर केले होते. या गर्दीच्या ठिकाणी उड्डाणपूल-ग्रेडसेपरेटर बांधणे शक्य आहे का? असल्यास नेमकी कशाची उभारणी करायची, यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांच्या नियुक्तीसाठी निविदा प्रकाशित करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा…पुणे : लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा
त्यानुसार सबडक्शन झोन यांची निविदा कमी दराने आल्याने त्यांना हे काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे प्रशासनाने ठेवला आहे. सल्लागारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडून या प्रकल्पांचा व्यवहारार्यतेबद्दलचा अहवाल महापालिकेला सादर केला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.