पुणे : पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची आणि तेथील सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. विमानाने प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्याच्या लौकिकास साजेशा अशा पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना उच्च आणि जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. या वेळी आमदार सुनिल टिंगरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक पी.के.दत्ता, विमानतळ संचालक संतोष डोके व संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नवीन विमानतळ टर्मिनल पुण्याच्या वैभवात भर घालणारे आहे. देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी पुण्यात येतात. या नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांच्या संख्येत आणि विमानांच्या फेऱ्यांमधे वाढ होणार असून त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या टर्मिनलमुळे विमान प्रवास क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. पुण्यातून देशांतर्गत आणि विदेशी विमान प्रवासाची मोठी सोय या टर्मिनलमुळे उपलब्ध झाली असून भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करण्यात आला आहे.

Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश
Jet Airways Air Service Industry Employment of employees
जेट एअरवेज: उदय-अस्ताचा ३२ वर्षांचा प्रवास
migratory birds arrived at mumbai bay
विदेशी पाहुण्यांचा मुंबई खाडीकिनारी विहार

हेही वाचा : पुण्यात आज भययुक्त वातावरणात ‘निर्भय सभा’, सभा उधळून लावण्याचा भाजपचा इशारा; निखिल वागळे यांच्याविरुद्ध गुन्हा

नव्या टर्मिनलमुळे प्रवासी तसेच व्यावसायीक सुविधा वाढणार आहेत. विमानळ परिसरात आकर्षक इनडोअर प्लँटस् लावावे, राज्यातील आणि पुण्यातील महत्वाच्या वारसा स्थळांची माहिती मराठी भाषेसह इंग्रजी भाषेत प्रदर्शित करावी, स्वच्छतेला प्राधान्य द्यावे अशा सूचना पवार यांनी यावेळी केल्या. त्यांनी एअरोब्रिज, विमान पार्किग, खाजगी विमान पार्किंग, चेक इन काऊंटर, व्हीआयपी लाऊंज, बॅगेज हँडलींगसह इतर सुविधांची पाहणी केली व माहिती घेतली. विमानतळ संचालक ढोके यांनी प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधा, आगमन-निर्गमन व्यवस्था, वाहनाची पार्किंग, बॅगेज हँडलिंग सिस्टीम, लाऊंज व अन्य सुविधांची आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या सुविधा तसेच जून्या विमानतळाच्या नूतनीकरणाबाबत माहिती दिली.