पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील सारथी मुख्यालय, शिक्षक भवनाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून आलो आहे. डेंग्यू झाल्याने १५ दिवस गेले. मला राजकीय आजार आहे, अशी चर्चा मी टिव्हीवर बघितली. मी काही लेचापेचा नाही आणि माझ्या स्वभावात राजकीय आजार वगैरे नाही. मी अमित शाह यांच्याकडे तक्रार करायला गेलो असं बोललं गेलं. मी काही तक्रार करणारा नाही. शासकीय इमारती चांगल्या असाव्यात, त्या सरकारी जागेत असाव्यात, उद्याची ५० वर्ष डोळ्यांसमोर ठेवून चांगले आर्किटेक घेऊन, अधिकारी यांच्याशी बोलून इमारती बांधत आहेत. वेगात काम सुरू आहे आणि निधी कमी पडू देणार नाही”, असे आश्वासन यावेळी पवार यांनी दिले.

ते म्हणाले, “अंतरवाली सराटी प्रकरणात अटक झाली त्याबाबत मला माहित नाही, त्याबद्दल मी माहिती घेतो. आरक्षणा बाबतीत काम सुरू आहे. सार्वजनिक संपत्ती नुकसान होऊ नये, जाणीवपूर्वक कोणावरही सरकार कारवाई करणार नाही. मुख्यमंत्री यांनी संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई केली आहे. फक्त जरांगेच नाही तर कोणीही भडकाऊ भाषण करू नये. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा आहे, हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवले आहे. सत्ताधारी असो वा विरोधक असो, कोणीही असो त्यांनी भडकाऊ भाषण करू नये. वाचाळवीरांनी एखाद्या शब्दाने समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यामध्ये सर्वच जण आले, प्रत्येकाचं नाव घेत नाही.”

obscene posts on social media of state women s commission chief rupali chakankar
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक
online delivery
‘ऑनलाइन डिलिव्हरी’वर अंकुश? वसतिगृहांकडून नियमावलीचे संकेत
fraud in lic investment plans news in marathi
पिंपरी- चिंचवड: एलआयसीच्या प्लॅनमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याचा आमिषाने आर्थिक फसवणूक
construction worker accident news in marathi
आठव्या मजल्यावरुन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू
Inconvenience , women , Lohgaon airport,
लोहगाव विमानतळावर महिलांसाठी असुविधा, काय आहे महिला प्रवाशांची मागणी ?
Pune, Mahametro , e-bike, passenger ,
पुणे : प्रवासी संख्या वाढविण्यासाठी महामेट्रोतर्फे ‘ई-बाईक’ शक्कल
pune Gaanasaraswati Mahotsav
‘जयपूर-अत्रौली घराणे; काल, आज आणि उद्या’
Tanaji Sawant , Rishiraj Sawant , Tanaji Sawant son,
ऋषिराज सावंत कथित अपहरणनाट्याच्या प्रत्येक वळणावर प्रश्नचिन्हे
12th exam copy loksatta news
बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी प्रकरणे उघडकीस? सर्वाधिक प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागात

हेही वाचा : पिंपरी चिंचवड : भाजप नेते गोपीचंद पडळकर घोड्यावर स्वार; ‘लगाम’ मात्र आमदार महेश लांडगे यांच्या हातात

चार राज्यांत निवडणूका असल्याने जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विधानाबाबत विचारले असता, “२०० आमदार एकत्रित असताना सरकार स्थिर कसं नाही. प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे न्यायालयात गेले आहेत. ती एक वेगळी प्रकिया आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं काम करत आहे”, असे पवार यांनी म्हटले आहे.

Story img Loader