पुणे : राज्यात करोनाच्या जेएन १ रुग्णांची संख्या वाढत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘करोनाबाबत राज्यात काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. या संपूर्ण परिस्थितीकडे राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन करोनासंदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात आदेश दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “आता बघा! अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस…”, अमोल कोल्हेंना अजित पवारांचं पुन्हा आव्हान

नुकत्याच झालेल्या काही राजकीय सर्वेक्षणांत भाजपच्या जागा कमी होत असल्याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘मी सर्व सर्वेक्षणाचा सन्मान करतो. ए व्होटर असो की बी व्होटर असो की डी व्होटर असोका झेड व्होटर असो हे लक्षात ठेवा की फक्त मोदीजींची हवा आहे. जनतेने ठरवले आहे की फक्त मोदींनाच मत द्यायचे. त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही ४० च्या पार जाणार म्हणजे जाणारच’, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.