पुणे : कोयना धरणाचे पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्याऐवजी सातारा, सांगली जिल्ह्यांतील नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी देण्याची लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे. याबाबत सामोपचाराने तोडगा काढू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी कोयनेचे पाणी शेती आणि पिण्यासाठी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सांगलीचे खासदार पाटील यांच्यात कोयनेतून सांगली जिल्ह्याला पाणी सोडण्यावरून वाद चिघळला आहे.

हेही वाचा : इंदापूरच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांचा उपोषणाचा इशारा

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर

हेही वाचा : ठोसा मारून खून करणाऱ्या महिलेला बेड्या

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रकरणी सामोपचाराने तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही शनिवारी पुण्यात दिली. दरम्यान, ससून रुग्णालयातील अंमली पदार्थांच्या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल. ससून रुग्णालय किंवा पोलिसांशी संबंधित कोणताही अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ससून प्रकरणी चौकशी अहवाल आल्यानंतर या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, ही महायुतीची भूमिका आहे, असेही पवार यांनी या वेळी सांगितले. अंमली पदार्थ तस्करांना फाशी दिली पाहिजे तरुण पिढीला बरबाद करण्याचे काम अंमली पदार्थांची तस्करी करणारे करत आहेत. अशा प्रकरणांत कायद्यात बदल करण्याची गरज असून दोषींना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. दूध, पनीर किंवा मिठाईत भेसळ करणाऱ्यांनाही कठोर शासन झाले पाहिजे. जे माणसाचा विचार न करता स्वत:च्या फायद्याचा विचार करतात, अशा लोकांची गय करता कामा नये, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

Story img Loader