पुणे : कोयना धरणाचे पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्याऐवजी सातारा, सांगली जिल्ह्यांतील नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी देण्याची लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे. याबाबत सामोपचाराने तोडगा काढू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी कोयनेचे पाणी शेती आणि पिण्यासाठी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सांगलीचे खासदार पाटील यांच्यात कोयनेतून सांगली जिल्ह्याला पाणी सोडण्यावरून वाद चिघळला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा