सिद्धार्थ केळकर

पुण्याच्या सामाजिक-राजकीय जीवनातील एक आद्य संस्था म्हणून जिची इतिहासात नोंद आहे, अशा पुणे सार्वजनिक सभेच्या दीडशेहून अधिक वर्षांच्या इतिहासाचे डिजिटायझेशन करण्याचे संस्थेने ठरवले आहे. दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेला या कामासाठी निधीची मात्र चणचण भासत आहे. पुण्यासह देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना, आज, दोन एप्रिल रोजी पुणे सार्वजनिक सभा आपला १५४ वा वर्धापनदिन साजरा करत आहे.

chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत
प्रज्ञावंतांना ऊर्जा देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे नवे पर्व
planning authorities , Devendra Fadnavis,
नियोजन प्राधिकरणांचे काम कंपनीच्या धर्तीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरविकास विभागाला निर्देश
Comprehensive development of the village in Palghar district with the help of schemes
समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास
Corporator Raj contract works Navi Mumbai corporators
नवी मुंबई : कंत्राटी कामांमध्ये ‘नगरसेवक राज’, प्रशासकाच्या काळातही प्रभावी नगरसेवकांची चलती

गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या पुढाकाराने दोन एप्रिल १८७० रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हेही संस्थेत सक्रिय होते. त्यांच्यामुळे ही संस्था केवळ पुण्यातीलच नव्हे, तर मुंबई प्रांतातील त्या वेळची सर्वांत महत्त्वाची राजकीय संघटना बनली. पुणे सार्वजनिक सभेने आपल्या कामात आता कालानुरूप बदल केले आहेत. मात्र, आतापर्यंतचे सर्व टप्पे हा ऐतिहासिक राजकीय-सामाजिक दस्तऐवज असल्याने त्याचे जतन महत्त्वाचे आहे. संस्थेचे अहवाल, पत्रे, इतिवृत्त, पावत्या असे सर्व संदर्भ संस्थेत जतन केलेले असले, तरी आता हे सर्व कागद अतिशय जीर्ण झाले असून, त्यांचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प संस्था हाती घेत आहे. त्याचप्रमाणे संस्थेची वेबसाइटही तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी नियमित देणग्यांव्यतिरिक्त अधिक निधी लागू शकतो. मात्र, त्याची सध्या चणचण आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर आणि कार्याध्यक्ष अनिल शिदोरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

हेही वाचा : पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर तब्बल ३७ वार करून खून करणाऱ्या तरुणास जन्मठेप

संस्थेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त संस्थेने मध्यंतरी ‘स्मृतिगंध’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यात काही पत्रे आणि संस्थेचा इतिहास आढळतो. त्यातील एकूणच रंजक नोंदी पाहता, सर्वच संदर्भांचे कायमस्वरूपी जतन-संवर्धन किती आवश्यक आहे, याची खात्री पटते. मुळात संस्थेच्या स्थापनेची गोष्टही रंजक आहे. ‘स्मृतिगंध’ ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे, पर्वती संस्थानात त्या वेळी झालेला गैरव्यवहार लोकांच्या नजरेस आणून द्यावा व त्यासंबंधी मत जाणून घ्यावे, या हेतूने सार्वजनिक काकांनी पुण्यातील लोकांची एक सभा १४ मार्च १८६९ रोजी बोलावली. विचारविनिमयानंतर रयतेची सर्वच गाऱ्हाणी सरकारदरबारी मांडण्यासाठी एका व्यापक सभेची स्थापना करायचे ठरले आणि पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

‘शहर पुणे’ या डॉ. अरुण टिकेकर यांनी संपादित केलेल्या ग्रंथातील लेखात प्रा. राजेंद्र व्होरा म्हणतात, सार्वजनिक सभेने १८७१ पासून केलेल्या राजकीय कार्यामुळे भारतीय राजकारणात सभेची प्रतिष्ठा १८८४-८५ च्या आसपास उंचावली होती. त्यामुळे जेव्हा राष्ट्रीय सभा (काँग्रेस) स्थापण्याचा विचार सुरू झाला, तेव्हा साहजिकच पुण्याचे नाव पुढे आले. सन १८८५ मध्ये पुण्यात पटकीची साथ असल्याने राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरविण्याचा पुण्याचा मान हुकला व ते मुंबईत भरले.

हेही वाचा : पिंपरीतील ३०० मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित, पाणीपट्टी थकविल्याने महापालिकेची कारवाई

सार्वजनिक काका आणि सदाशिवराव गोवंडे यांच्या प्रोत्साहनाने दोघांच्या पत्नींनी १८७३ मध्ये स्त्री विचारवती सभेची स्थापना केली. स्त्रियांनी शिक्षण मिळावे व त्यांची उन्नती व्हावी, ही या सभेची उद्दिष्टे होती. या सभेने पुण्यात स्त्रियांसाठी त्या काळी सार्वजनिक हळदी-कुंकू आयोजित केले. सर्व जातींमधील स्त्रियांसाठी एकत्रितपणे साजरे होणारे असे हे पहिलेच हळदी-कुंकू, असा उल्लेख ‘स्मृतिगंध’ ग्रंथात सापडतो. हळदी-कुंकू समारंभाची ही परंपरा पुणे सार्वजनिक सभेने आजतागायत जपली असून, यंदाही हा कार्यक्रम पार पडला. विविध समाजघटकांतील १५० स्त्रिया यंदाच्या हळदी-कुंकू समारंभाला उपस्थित होत्या. त्यामध्ये देवदासी, परिचारिका आदींचाही समावेश होता, अशी माहिती नारगोलकर यांनी दिली.

हेही वाचा : धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा

होमरूल चळवळ, माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा आदी घटनांपासून स्वातंत्र्योत्तर काळात चीन युद्धाच्या वेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पाठविलेले पत्र इथपर्यंतच्या घटनांपर्यंतच्या काही नोंदी संस्थेच्या इतिहासात सापडतात. तरी, अनेक पत्रे मोडी लिपीत असून, त्यांचे लिप्यंतर करण्यास आवश्यक मनुष्यबळ आणि निधी नसल्याने, तसेच १९५२ मध्ये संस्थेच्या इमारतीला लागलेल्या आगीत काही कागदपत्रांचे नुकसान झाल्याने त्यांची नीट पडताळणी अवघड झाली आहे. खरेतर या नोंदींचे आधुनिक स्वरूपात दस्तऐवजीकरण करणे आता क्रमप्राप्त आहे, अशी भावना शिदोरे यांनी व्यक्त केली.

Story img Loader