पुणे : एका महिलेला जन्मजात दुर्मीळ हृदयविकार असल्याने तिला गर्भधारणेविरुद्ध अनेक डॉक्टरांनी सल्ला दिला होता. तिच्या हृदयाला दोन झडपांऐवजी एकच झडप असल्याने मोठी गुंतागुंत निर्माण झाली. मात्र, महिलेने मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी योग्य वैद्यकीय उपचार नियोजनाद्वारे तिची सुखरूप प्रसूती केली असून, तिने निरोगी बाळाला जन्म दिला आहे.

या महिलेचे वय ३१ वर्षे आहे. तिला जन्मजात हृदयविकार आहे. तिच्या प्रकृतीमुळे गर्भधारणा न करण्याचा सल्ला तिला देण्यात आला होता. गर्भधारणेमुळे महिला आणि तिच्या बाळाला धोका होता. असे असतानाही तिने गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला. गर्भवती असताना तिने रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू केले. प्रसूतीतज्ज्ञ डॉ. रश्मी भामरे आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी महिलेच्या गर्भधारणेच्या मार्गातील गंभीर गुंतागुंत शोधून काढली. या महिलेच्या गर्भाची २४ आठवडे योग्य वाढ होत नव्हती. डॉक्टरांनी उपचाराद्वारे त्यावर मार्ग काढला. अखेर या महिलेची सुखरूप प्रसूती होऊन तिने निरोगी बाळाला जन्म दिला.

हेही वाचा : पुणे: वडकी गावात सापडल्या जिलेटिनच्या कांड्या

याबाबत प्रसूतीतज्ज्ञ डॉ. रश्मी भामरे म्हणाल्या की, हृदयातील दुर्मीळ दोष, गर्भाची योग्य वाढ होण्यातील अडचण आणि संपूर्ण गर्भधारणेदरम्यान जवळून निरीक्षण करण्याची गरज यामुळे हे आव्हानात्मक होते. आमच्या डॉक्टरांनी आई आणि बाळ दोघांचेही जीव वाचवण्यासाठी उपचारांचे सतत मूल्यमापन केले. रुग्णावर सिझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती केली. आता आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा : “मी पालकमंत्री असताना अशा चिंताजनक घटना घडल्या नाहीत”, चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा रोख कुणाकडे?

अखेर ह्या गुंतागुंतीच्या स्थितीमधून वाचले आणि माझ्या मुलाला मिठीत घेतल्याने मी आनंदाने भारावून गेले. या डॉक्टरांनी मला आशा दाखविली आणि माझी माता होण्याची इच्छा प्रत्यक्षात आणली.

महिला रुग्ण

Story img Loader