पुणे : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांच्या त्या पदासाठीच्या पात्र-अपात्रतेचा मुद्दा गाजत होता. त्यावरून न्यायालयीन प्रक्रियाही पूर्ण झाल्यानंतर आता डॉ. रानडे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे. गोखले संस्थेचे कुलपती डॉ. संजीव सन्याल यांना त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले आहे.

गोखले संस्थेच्या कुलगुरू पदी डॉ. अजित रानडे असण्यावरून वाद निर्माण झाला होता. डॉ. रानडे यांच्याकडे या पदासाठी आवश्यक पात्रता नसल्याचा आक्षेप घेऊन तक्रारी करण्यात आल्या. तत्कालीन कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनी सत्यशोधन समिती नियुक्त करून समितीच्या शिफारसीनुसार डॉ. रानडे यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला डॉ. रानडे यांनी न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने डॉ. देबराय यांच्या निर्णयाला स्थगिती देत डॉ. रानडे यांना दिलासा दिला. त्यानंतर डॉ. देबराय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. संजीव सन्याल यांची कुलपती पदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी डॉ. रानडे यांच्यावरील कारवाईचे पत्र मागे घेत असल्याचे न्यायालयाला कळवले. त्यानंतर या वादावर पडदा पडला होता.

Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
Khar Gymkhana Cancel Cricketer Jemimah Rodrigues Membership
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द; वडिलांतर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे कारवाई
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : ‘जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार?’, राजू पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
Breaking: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली; मतदान १५ दिवसांवर असताना मोठी घडामोड!

हेही वाचा : पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

या पार्श्वभूमीवर डॉ. रानडे यांनी डॉ. सन्याल यांना राजीनाम्याचे पत्र सादर केले आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. देशातील सर्वांत चांगल्या संस्थांपैकी एक असलेल्या गोखले संस्थेचे अडीच वर्षांसाठी नेतृत्त्व करण्याची संधी दिल्याबद्दल व्यवस्थापन मंडळ, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी, प्राध्यापक आणि कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य सर्व भागीदार घटकांचे आभार. उत्कृष्टता साध्य करण्यासाठी संस्थेला शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच माझा राजीनामा संस्थेच्या कुलगुरूपदी २०२१मध्ये झालेल्या माझ्या नेमणुकीसाठी कोणत्याही पद्धतीने त्रुटी किंवा अपात्रता दर्शवत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान गोखले संस्थेच्या प्रशासनाकडूनही डॉ. रानडे यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.