पिंपरी-चिंचवड: जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर नियंत्रण सुटून ट्रेलरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रेलरला भीषण आग लागली. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : पिंपरी : चिंचवड शहरातील भाजपमधील गटबाजी उघड; इच्छुकांना डावलत विधानसभा उमेदवारीसाठी ‘या’ तिघांची नावे प्रदेशकडे

Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Mumbai Ahmedabad National Highway , Traffic ,
राष्ट्रीय महामार्गावर ‘मेगाब्लॉक’
Fatal accident on Shilphata road thane accident news
शिळफाटा मार्गावर भीषण अपघात; रिक्षा चालक गंभीर जखमी
fire, car showroom, Santacruz, Mumbai,
मुंबई : सांताक्रुझमधील गाड्यांच्या शोरूमला भीषण आग
boy studying in class 10 killed his father with help of his mother in Hudkeshwar police station limits
Video : आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट, महागड्या कार भस्मसात; मलकापूरमध्ये भीषण…
prayagraj mahakumbhmela fire
Mahakumbh Mela : महाकुंभ मेळ्यात सिलिंडर स्फोटामुळे १८ तंबूंमध्ये भीषण अग्नीतांडव; मुख्यमंत्री आदित्यनाथ घटनास्थळी दाखल!

मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातामुळे काही काळ मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ येऊन आग आटोक्यात आणली आहे. आगीत ट्रेलर जळून खाक झाल आहे. वडगाव मावळ अग्निशमन दल, देवदूतच्या आणि आयआरबीच्या टीमने आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात ट्रेलर चालक गंभीर भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रेलरला लागलेली आग आटोक्यात आणून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Story img Loader