Pune Paud Road Accident: शहरातील कल्याणीनगर भागात काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. त्या घटनेनंतर आता पुणे शहरातील पौड रस्त्यावर मद्यधुंद टेम्पो चालकाने सात ते आठ वाहनांना धडक दिली आहे. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. गीतांजली आमराळे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा: मद्यपी पतीचा चाकूने भोसकून खून; नऱ्हे भागातील घटना

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील करिश्मा सोसायटीच्या बाजूने टेम्पो चालक आशिष पवार हा भरधाव वेगाने सावरकर पुलाच्या दिशेने निघाला होता. त्या दरम्यान त्याने ६ चार चाकी आणि २ दुचाकी वाहनांना जोरात धडक दिली. अपघातानंतर टेम्पो चालक आशिष पवारला वाहनांमधून उतरून नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले असून या घटनेत टेम्पो चालकाने मद्यपान केल्याचे दिसून आले आहे. तसेच या घटनेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टेम्पो चालक आशिष पवार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडळाच्या कार्यकर्त्यांची तत्परता

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील एरंडवणे मित्र मंडळ, बाल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळाचे कार्यकत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वी गीतांजली अमराळे यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. श्रीकांत अमराळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असून, शास्त्रीनगरमधील संगम मित्र मंडळाचे ते पदाधिकारी आहेत. गौरी आगमनानिमित्त पूजासाहित्य खरेदीसाठी अमराळे दाम्पत्य निघाले होते. अपघातात गीतांजली यांचा मृत्यू झाल्यानंतर शास्त्रीनगर परिसरात शोककळा पसरली.

हेही वाचा : पुणे: घोरपडे पेठेतील गुंड जंगल्या सातपुतेचा खुनाचा कट उधळला, एन्जॉय ग्रुपच्या सातजणांना अटक; सात पिस्तुलांसह २३ काडतुसे जप्त

कर्वे रस्ता मृत्यूचा सापळा

कर्वे रस्त्यावर गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटना वाढीस लागल्या आहेत. रसशाळा चौकात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राखी पौर्णिमेच्या दिवशी अपघाताची घटना घडली होती. डंपरच्या धडकेत सुनील भास्करराव देशमुख (वय ६०, रा. निको गार्डन, विमाननगर) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डंपरचालक सुनील बाबू होले (वय ३५, रा. गल्ली क्रमांक १६, गोखलेनगर) याला अटक करण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वी जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकाऱ्याचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावर घडली होती. अपघातात जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी कृष्णा गणपती देवळी (वय ६७, रा. कोथरूड) यांचा मृत्यू झाला होता. सायकलस्वार देवळी यांना डंपरने धडक दिली होती. याप्रकरणी क्रेनचालक सलामत अली (वय २६ मूळ. रा. उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Story img Loader