पुणे : ऑनलाईन पैसे हस्तांतरण (पेमेंट) सुविधा देणाऱ्या इझी पे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील ६५ प्रतिनिधींनी तांत्रिक सुविधेचा गैरवापर करुन कंपनीची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडून दोन आरोपींना पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातून अटक करण्यात आली. उबेद उर्फ उब्बेदुल्ला अन्सारी (वय ३६, रा. गया, बिहार), आयुब बाशिर आलम (वय २०, रा. गया, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघे पश्चिम बंगालमध्ये वास्तव्यास होते. याप्रकरणी यापूर्वी अंकितकुमार अशोक पांडे (वय २०, रा.नवादा, बिहार), छोटू उर्फ एजाज आलम यांना अटक करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : भुजबळांना पडली दौंडमधील ‘केडगाव पॅटर्न’ची भूरळ; उद्या घेणार इंदापुरात सभा… जाणून घ्या केडगाव पॅटर्न आणि सभेमागील गुपित

इझी पे कंपनीचे येरवड्यात कार्यालय आहे. कंपनी देशभरात ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देते. त्यासाठी कंपनीने नोंदणीकृत प्रतिनिधींची नेमणूक केली आहे. ११ ऑगस्ट २०२२ पासून कंपनीच्या ६५ प्रतिनिधींनी संगनमत केले. तांत्रिक सुविधेचा गैरवापर करुन कंपनीच्या खात्यातून तीन कोटी ५२ लाख ७० हजार रुपये हस्तांतरित केले. कंपनीच्या खात्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तेव्हा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाकडू सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल. या गुन्ह्याचा सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपास करुन आरोपी पांडेला अटक करण्यात आली. अन्सारी आणि आलम कोलकाता शहरात वास्तव्यास असल्याची महिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक केली.

हेही वाचा : पिंपरी: बेकायदा आधारकार्ड सेवा केंद्राद्वारे बनावट कागदपत्रे बनवणा-या टोळीचा पर्दाफाश; दाम्पत्यासह चार जण गजाआड

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक तुषार भोसले, नवनाथ जाधव, निलेश लांडगे, संदेश कर्णे यांनी ही कामगिरी केली.