पुणे : राज्यातील शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या राज्यभरातील हजारो उमेदवारांना दिलासा देणारी बातमी आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळावर तत्काळ जाहिराती देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. राज्यात शिक्षकांच्या तीस हजार भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी अभियोग्यता चाचणी घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र बिंदुनामावली तपासणी, शिक्षक समायोजन अशी तांत्रिक प्रक्रिया लांबली आहे. शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सुविधा ऑक्टोबरमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र अद्याप जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नसल्याने त्यासाठी उमेदवारांनी उपोषण, आंदोलनेही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : रेल्वेने प्रवास करताय? ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल

या पार्श्वभूमीवर पवित्र संकेतस्थळा‌वर जाहिरात देण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले. पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती संकेतस्थ‌ळावर नोंद करण्याची सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवर देण्यात आली आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी नोंद केलेली माहितीची पडताळणी करून ती योग्य असल्यास बिंदुनामावली, विषयनिहाय रिक्त पदांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लॉगिनद्वारे मान्य करायची आहे.

हेही वाचा : “…तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही”, शरद पवार यांचा निर्धार

त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवर जाहिरात तयार करणे (जनरेट ॲडव्हर्टाइजमेंट) यावर क्लिक केल्यावर जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदांची जाहिरात तयार होणार आहे. ही कार्यवाही करण्यासाठी आवश्यक आरक्षणनिहाय रिक्त पदे, गट, विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती विनाविलंब होण्यासाठी पवित्र संकेतस्थळावरील सूचनांनुसार तत्काळ जाहिरातदेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.