पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक, तसेच कराडमधील यशवंत सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राज्याच्या सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी याबाबतचे आदेश दिले. शेखर सुरेश चरेगांवकर यांच्यासह बुलढाणा येथील चिखली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश भगवानदास गुप्ता यांच्यासह साथीदारांनी संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप रामचंद्र चोरघे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) स्थापन विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चरेगावकर यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध ५ मार्च रोजी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी तक्रारदारांना गुंतवणूक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यापैकी साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राज्याच्या सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायालयाने फेटाळला.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-04-2024 at 23:15 IST
TOPICSपुणेPuneपुणे न्यूजPune NewsफसवणूकFraudफसवणूकीचं प्रकरणCheating Caseमराठी बातम्याMarathi News
+ 1 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune ex president of state co operative council shekhar charegaonkar s pre arrest bail rejected pune print news rbk 25 css