पुणे : देशात उत्पादित होणाऱ्या पौष्टिक तृणधान्यांची सर्वाधिक निर्यात अरबी देशांना झाली आहे. प्रामुख्याने ज्वारी आणि बाजरीला मागणी आहे. पण, तृणधान्यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना अद्याप नगण्य मागणी आहे. कृषी विभागातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण ६०८ कोटी रुपये किंमतीच्या १,६९,०४२ लाख टन तृणधान्यांची निर्यात झाली होती. त्या संयुक्त अरब अमिरातीला सर्वाधिक १०८ कोटी रुपये किंमतीच्या ३४ हजार १७ टनांची, सौदी अरेबियाला २४ हजार ५१९ टना, नेपाळला २० टन, जर्मनीला १० टन, जपानला २७ टन आणि अमेरिकेला २१ टन आणि अन्य देशांना ८० टनांची निर्यात झाली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये ऑक्टोंबरअखेर ३२७ कोटी रुपयांच्या ८४ हजार ५९२ टन तृणधान्यांची निर्यात झाली असून, मागील वर्षा सारखीच सयुंक्त अरब अमिरातीला १५,०७९ टन, सौदी अरेबियाला ११,०६१ टन, नेपाळला ९,७७७ टन, जर्मनीला १,८०९ टन, जपानला ३,७१४ टन, अमेरिकेला १,५४३ टन आणि अन्य देशांना ४१,६०९ टन तृणधान्यांची निर्यात झाली आहे.
पौष्टिक तृणधान्यांची निर्यात वाढली! कोणत्या देशांना झाली सर्वाधिक निर्यात?
प्रामुख्याने ज्वारी आणि बाजरीला मागणी आहे. पण, तृणधान्यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना अद्याप नगण्य मागणी आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-01-2024 at 21:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune export of nutritious cereals increased to arab countries pune print news dbj 20 css