पुणे : लष्कर भरतीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या तोतया जवानाला पोलिसांनी अटक केली. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने ही कारवाई केली. तोतयाला पकडून बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीने महाराष्ट्रासह कर्नाटकातील तरुणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नितीन बालाजी सूर्यवंशी (रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे. याबाबत भरत रमेश महाटे (वय २३, रा. नागराळ, ता. मुखेड, जि. नांदेड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाटे सध्या हडपसर भागात राहायला आहेत. महाटे याला लष्करात भरतीचे आमिष दाखवून आरोपी सूर्यवंशीने जाळ्यात ओढले. सूर्यवंशी हा १३ ऑगस्ट २०२४ रोजी महाटे याला उदगीर रेल्वे स्थानकात भेटल होता. महाटे शेती करताे. त्या वेळी त्यांची ओळख झाली. आरोपी सूर्यवंशीने लष्करात जवान असल्यचाी बतावणी केली. लष्कर, पोलीस दलात भरतीचे आमिष दाखविले. त्यानंतर दोघे जण एकमेकांच्या संपर्कात आले. आरोपीने महाटे यांच्याकडून एक लाख ७५ हजार रूपये घेतले. त्यानंतर १७ ऑगस्ट २०२४ रोजी त्याला लष्कराच्या दक्षिण मुख्यालय परिसरात भेटायला बोलावले. त्या वेळी सूर्यवंशी लष्करी जवानासारखा गणवेश परिधान केला होता.

त्यानंतर महाटेने लष्कर भरतीबाबत विचारणा केली. महाटेने आरोपीला १९ जानेवारी रोजी आणखी रक्कम घेतली. महाटेकडून त्याने वेळोवेळी तीन लाख रुपये घेतले. मार्च महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची बतावणी त्याने केली. महाटेने त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा सूर्यवंशीने त्याला प्रतिसाद दिलाा नाही. याबाबतची माहिती लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली. त्यानंतर सापळा लावून सूर्यवंशीला ताब्यात घेण्यात आले. सूर्यवंशीने महाराष्ट्रासह कर्नाटकातील तरुणांची फसवणूक केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. बंडगार्डन पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Story img Loader