पुणे : कात्रज घाटात वणवा लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून रात्री उशिरा आग आटोक्यात आणली. कात्रज घाटातील डोंगरावर रविवारी रात्री झाडांचा पाचोळ्याला आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याचे वाहनचालक, तसेच रहिवाशांनी पाहिले. कात्रज येथील अग्निशमन दलाला याबाबतची माहिती कळविण्यात आली. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
हेही वाचा : महायुतीचे जागावाटप दोन दिवसांत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण
आग अन्यत्र पसरू न देण्याची काळजी जवानांनी घेतली. आग पूर्ण आटोक्यात आल्यानंतर जवान तेथून रवाना झाले. उन्हाळ्यात शहरातील टेकड्या, मोकळ्या जागेत पडलेल्या पालपाचोळ्याला आग लागण्याच्या घटना घडतात. आठवड्यापूर्वी येरवडा येथील डेक्कन काॅलेजच्या आवारातील मोकळ्या जागेत वणवा पेटला होता. यापूर्वी तळजाई, वेताळ टेकडी परिसरात वणवा पेटला होता. वाढत्या उन्हामुळे वणवा पेटण्याच्या घटना घडतात, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.