पुणे : एनडीए रस्त्यावरील शिवणे ओैद्योगिक वसाहतीतील कंपनीत आग लागल्याची घटना घडली. आगीत तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक साहित्य जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवणेतील देशमुखनगर परिसरात इंडीटेक इलेक्ट्रो सिस्टीम कंपनी आहे. पाच मजली इमारतीतील तळमजल्यावर इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी इलेक्ट्रिक साहित्याला आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता आणि वारजे अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले.

तळमजल्यावरील इलेक्ट्रिक साहित्याने पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करुन पाऊणतासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. कंंपनीच्या आवारात अग्निरोधक यंत्रणा नव्हती, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.