पुणे : तीन वर्षांच्या बालकाच्या वाढदिवसाची तयारी करत असताना अचानक आग लागली. इमारतीतून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्याने घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन वर्षांच्या बालकासह पाच महिलांची सुटका केल्याची घटना कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात मंगळवारी दुपारी घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोंढव्यातील भागोदयनगर परिसरात गल्ली क्रमांक ३४ मधील एका इमारतीतील दुकानात मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या कपड्यांच्या दोन दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे लक्षात आले. इमारतीतील सदनिकेत पाच वर्षांचा मुलगा, तसेच पाच महिलांना धुरामुळे बाहेर पडता येत नव्हते. जवानांनी प्रसंगावधान राखून पाण्याचा मारा सुरू केला. आग इमारतीत पसरणार नाही, याची काळजी घेण्यात आली. जवानांनी श्वसन यंत्र परिधान करुन घरात अडकलेल्या तीन वर्षांच्या बालकासह पाच महिलांची सुटका केली.

हेही वाचा : पुणे : प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुंडासह साथीदार गजाआड

आगीत कपडे, लाकडी साहित्य, विद्युत उपकरणे, यंत्रसामुगी जळाली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. आगीत एका महिलेसह अग्निशमन दलाच्या जवाानाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. आगीत अडकलेल्या तीन वर्षांच्या बालकांचा मंगळवारी वाढदिवस होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळल्याने रहिवाशांनी कौतुक केले. अग्निशमन दलातील वाहनचालक रवींद्र हिवरकर, सत्यम चौखंडे, रफिक शेख, किशोर मोहिते, योगेश पिसाळ, सागर दळवी, निलेश वानखेडे, कुणाल खोडे, गोविंद गिते, हर्षल येवले, हर्षवर्धन खाडे यांनी ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune fire brigade rescued three year old boy and five woman from fire at building in kondhwa bhagyoday nagar area pune print news rbk 25 css