पुणे : खराडीतील गोदामात आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. आग लागल्यानंतर मोठा धूर झाल्याने परिसरात घबराट उडाली. महापाालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून जप्त केलेले साहित्य गोदामात ठेवले होते. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खराडीत शिंदे डेअरीजवळ असलेल्या गोदामात महापालिकेने एका गोदामात अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य ठेवले होते. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. गोदामातील साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाल्याने परिसरात घबराट उडाली.

हेही वाचा…पुणे : तपास यंत्रणांची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची दोन कोटींची फसवणूक

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, आगीमागचे कारण समजू शकले नाही. आगीत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.