पुणे : गोकुळअष्टमीनिमित्त फुले खरेदीसाठी बाजारात रविवारी गर्दी झाली. फुलांना मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. गोकुळअष्टमी सोमवारी (२६ ऑगस्ट) आहे. गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असल्याने फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. फुले खरेदीसाठी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी गर्दी झाली होती. मंडईतील हुतात्मा बाबू गेणू चौक परिसरात फुले खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. सुक्या फुलांना चांगली मागणी असून, फुलांच्या दरात वाढ झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

हेही वाचा : पुणे : वीर गोगादेव उत्सवानिमित्त लष्कर भागात उद्या वाहतूक बदल

tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Batoge To Katoge wedding card viral
हद्दच झाली! लग्नाच्या पत्रिकेवरही आता ‘बटोगे तो कटोगे’चा नारा; व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेत मोदी-योगींचा फोटो

गोकुळअष्टमी विविध मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सजावट, तसेच पुजेसाठी फुलांना चांगली मागणी आहे. सोमवारी फुलांची आवक वाढणार आहे. पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फुले विक्रीस पाठविली आहेत, असे भोसले यांनी सांगितले. घाऊक बाजारात फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे – झेंडू २० ते ८० रुपये किलो, गुलछडी (सुटी)- २०० ते ३०० रुपये किलो, अष्टर- जुडी २५ ते ३० रुपये, सुटी – १०० ते १५० रुपये, शेवंती – ८० ते १५० रुपये, गुलाब गड्डी – २० ते ३० रुपये, गुलछडी काडी – ५० ते ८० रुपये, डच गुलाब – ८० ते १३० रुपये, जर्बेरा – ६० ते ९० रुपये, कार्नेशियन – १५० ते २०० रुपये, शेवंती काडी – २५० ते ३०० रुपये, लिलियम (१० काड्या) – ८०० ते ९०० रुपये, ऑर्चिड – ४०० ते ५०० रुपये, जिप्सेफिला – १५० ते २०० रुपये, जुई – १००० ते १५०० रुपये