पुणे : गोकुळअष्टमीनिमित्त फुले खरेदीसाठी बाजारात रविवारी गर्दी झाली. फुलांना मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. गोकुळअष्टमी सोमवारी (२६ ऑगस्ट) आहे. गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असल्याने फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. फुले खरेदीसाठी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी गर्दी झाली होती. मंडईतील हुतात्मा बाबू गेणू चौक परिसरात फुले खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. सुक्या फुलांना चांगली मागणी असून, फुलांच्या दरात वाढ झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in