पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराइतांकडून चार पिस्तुले, तसेच काडतुसे जप्त केली. गुन्हे शाखा आणि स्वारगेट पोलिसांनी ही गुलटेकडी भागात ही कारवाई केली. गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून गस्त घालण्यात येत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगणाऱ्या गुंडाविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. गुलटेकडीपासून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघे जण पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून अविनाश पोपट मोरे (वय ३०, रा. मुख्य बाजारपेठ, शिरवळ) आणि क्षितीज‌ भाऊसाहेब भोसले (वय २०, रा. खंडाळा, जि. सातारा) यांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीच्या तीन पिस्तुलांसह सहा काडतुसे जप्त करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, उपनिरीक्षक नितीन कांबळे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश नेवसे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा : त्यागी लोकप्रतिनिधी आणि पदनिष्ठ राजकारणी

पिस्तूल विक्री प्रकरणात एकास अटक

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराइताला स्वारगेट पोलिसांनी गुलटेकडी परिसरातून अटक केली. श्याम युवराज उमाप (वय २४, रा. मीनताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. उमाप पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राहुल काेलंबीकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून उमापला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल काेलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, सुधीर इंगळे, संदीप घुले, सुजय पवार यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune four pistols seized from criminals ahead of vidhan sabha election 2024 pune print news rbk 25 css