पुणे : मानलेल्या भावाने चार वर्षांच्या भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एकाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार एका ३५वर्षीय तरुणाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने आरोपीला भाऊ मानले होते. त्याचे महिलेच्या घरात नेहमी यायचा. रविवारी सकाळी महिला आणि तिचे पती घरात नव्हते. घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी चार वर्षांच्या बालिकेला घरातून बाहेर घेऊन गेला. त्यावेळी बालिकेची मोठी बहीण घरात होती. तिने त्याला विरोध केला. त्यानंतर त्याने घोरपडीतील लोहमार्गाजवळ बालिकेवर अत्याचार केला.
या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर मुलीला तातडीने ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. बालिकेवर अत्याचार करून आरोपी पसार झाला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील शाळांमध्ये योग्य आणि अयोग्य स्पर्शाबाबत (गुड टच ,बॅड टच) समुपदेशन करण्यात येत असल्याने अत्याचारांच्या घटनांना वाचा फुटली आहे.
हेही वाचा : पेट्रोल पंपचालकांचा उद्यापासून बेमुदत बंद... काय आहे कारण?
वस्त्र दालनाच्या मालकाकडून कर्मचारी युवतीचा विनयभंग
वस्त्रदालनात काम करणाऱ्या युवतीचा मालकाने विनयभंग केल्याची घटना लक्ष्मी रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी वस्त्रदालनाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. बाला प्रसाद असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित युवती वस्त्रदालनात कामाला आहे. रविवारी सकाळी युवती नेहमीप्रमाणे युवती कामावर आली. त्यावेळी एका महिला ग्राहकाला साडी बदलून हवी, असे सांगून युवतीला दुसऱ्या विभागात पाठविले. त्यानंतर वस्त्रदालनाचा मालक आरोपी बाला प्रसाद युवतीच्या मागोमाग केला. तेव्हा तू काल मला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. मला बरे वाटले, असे त्याने युवतीला सांगितले. त्यानंतर त्याने युवतीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या युवतीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नरवडे तपास करत आहेत.