पुणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन टोळक्याने एका ज्येष्ठावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पंजाबसिंग फौजीसिंग कल्याणी (वय ६५, रा. रामटेकडी, हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रवीसिंग शामसिंग कल्याणी, हुकूमसिंग रामसिंग कल्याणी, रामसिंग मोहनसिंग कल्याणी, अजयसिंग हुकूमसिंग कल्याणी, ऐलानसिंग रामसिंग कल्याणी, जिंदालसिंग रामसिंग कल्याणी, हिंदूसिंग रामसिंग कल्याणी, राजूसिंग रामसिंग कल्याणी, निहालसिंग शामसिंग कल्याणी, सोनीहालसिंग शामसिंग कल्याणी, बसंतीकौर शामसिंग कल्याणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री पंजाबसिंग कल्याणी रामटेकडी परिसरात घरासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. पोलिसांना दरोडा टाकल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप करून त्यांनी पंजाबसिंग यांच्यावर तलवारीने हल्ला चढविला. त्यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. त्यावेळी पंजाबसिंग यांचा नातू धनराजसिंग याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्याच्या हातावर तलवारीने वार केला.

Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
Kalyan Scuffle Abhijeet Deshmukh
Kalyan Scuffle : कल्याणमधील सोसायटीत नेमकं काय घडलं? जखमी अभिजीत देशमुख म्हणाले, “त्याच्याकडे पिस्तुल…”
Deputy Chief Minister Eknath Shinde visited Smriti Mandir premises and talk about RSS
एकनाथ शिंदे म्हणाले, “संघाकडून निस्वार्थ भावनेने काम कसे करावे…”
Vishwanath Baburao Chakote , Former MLA Complaint ,
काँग्रेसच्या माजी आमदाराची शेतजमीन भाऊ, पुतण्याने लाटली; सोलापुरात गुन्हा
Eknath Shinde
Eknath Shinde On RSS : “संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात…”; आरएसएस मुख्यालयात पोहचताच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
dead body of dog wrapped in a sheet pune
पिंपरी : चादरीत गुंडाळलेला ‘तो’ मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले

हेही वाचा…तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी मल्टिपल एंट्री-एक्झिटचा पर्याय लागू… काय आहे निर्णय?

आरोपींनी तलवारी उगारून दहशत माजविली, तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक करणकोट यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.

Story img Loader