पुणे : कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासाेबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबतची प्राथमिक माहिती कोंढवा पोलिसांना दिली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित तरुणी मूळची परराज्यातील आहे. तिचा मित्र जळगावमधील आहे. दोघे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी अणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले हाेते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले. त्यानंतर घाबरलेल्यातरुणीला मित्राने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती (एमएलसी) मध्यरात्री कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तातडीने तपास करण्याचे आदेश देण्यात आले. शुक्रवारी सकाळी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कार प्रकरणातील पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची दहा पथके रवाना झाली आहेत.

हेही वाचा : यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरण्या होणार?

तीन दिवसांपूर्वी बोपदेव घाटात तरुणीचा विनयभंग

तीन दिवसांपूर्वी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली होती. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालक राजेखाँ करीम पठाण (वय ३६, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली. तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. त्यावेळी पठाण मोटारीतून तेथे आला. त्याने एका मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. या ठिकाणी जोडप्यांना बंदी आहे, असे सांगून त्याने तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राची मोबाइलवरून छायाचित्रे काढली. तरुणीला धमकावून त्याने तिला मोटारीत बसण्यास सांगितले. त्यानंतर मोटार कोंढव्यातील खडी मशीन चौकात नेली. तेथील एका गल्लीत मोटार थांबवून तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून पठाण पसार झाला होता.

अत्याचाराच्या वाढत्या घटना

शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वानवडी परिसरात एका शाळेतील दोन मुलींवर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (३ ऑक्टोबर) उघडकीस आली. पोलिसांनी गाडीचालकाला अटक केली. संतप्त कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केली होती. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले होते. विविध संस्था, संघटना, तसेच राजकीय पक्षांनी याप्रकरणी आंदोलन केले होते.

हेही वाचा : मराठीत लेखन आता अभिमानास्पद’

बोपदेव घाट धोकादायक

बोपदेव घाटात फिरायला येणाऱ्या तरुण-तरुणींना धमकावून लुटमारीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यापूर्वीही या भागात तरुणींना धमकावून अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. बोपदेव घाटातील लुटमारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना गस्त घालण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते.

काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाट येथील एका मैदानावर दोघे मित्र मैत्रिणी फिरण्यास गेले होते. त्यावेळी तिघे जण आले आणि त्यांनी दोघांना दमदाटी केली. त्यावेळी पीडित तरुणीच्या मित्राला मारहाण करीत त्याचे कपडे काढले आणि त्याला झाडाला बांधले. त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यास विविध भागात टीम रवाना झाल्या आहेत.

रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे</strong>
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune gangrape on a girl who went to bopdev ghat with her friend near kondhwa pune print news rbk 25 css