पुणे : पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीतील मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाच्या गणेश मूर्तीचे दुपारी साडेचार वाजता विसर्जन झाले. रंगावलीच्या मनमोहक पायघड्या, बँडपथकातील वादकांचे सुमधूर वादन, विविध तालाचा आविष्कार घडविणारे ढोल-ताशा पथकातील कलाकारांचे वादन अशा उत्साहपूर्ण वातावरणात साडेसहा तासांनी या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ठीक दहा वाजता महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि कसबा गणपतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणूक प्रारंभ झाला आहे.

हेही वाचा : ‘ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका…’ पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत अनोखी पुणेरी पाटी

श्री कसबा गणपती मंडळ लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणूक मार्गाने सकाळी दहा वाजता निघाले. दुपारी ४.३५ वाजता या मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यंदा या मंडळाच्या मिरवणुकीत प्रभात बँडपथक, कामायनी प्रशाला आणि बँक ऑफ इंडियाचे पथक होते. या मंडळानंतर मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ, मानाचा चौथा तुळशीबाग मंडळ आणि मानाचा पाचवा केसरी सार्वजनिक गणेश मंडळ ही मानाची मंडळे आहेत.

Story img Loader