पुणे : धनकवडीतील के. के. मार्केटजवळ असलेल्या एका उपहारगृहात गॅस सिलिंडरमधून गळती होऊन झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. उपाहारगृहशेजारी असलेल्या दोन दुकानांना आगीची झळ पोहोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे पूर्ण नाव समजले नाव आहे. संतोष (वय २४) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडीतील के. के. मार्केटजवळ साईबा हाॅटेल आहे. रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास हाॅटेलमधील भटारखान्यात गॅस सिलिंडरची गळती सुरू झाली. गॅस गळती झाल्याने स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच कात्रज आणि गंगाधाम अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. केंद्र प्रमुख सुनील नाईकनवरे, रामदास शिंदे, भरत वाडकर, बांदीवडेकर यांच्यासह जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भटारखान्यात एक कामगार अडकल्याची माहिती जवानांना मिळाली. जवानांनी आग आटोक्यात आणून त्वरीत कामगाराला बाहेर पडले. आग भडकल्याने शेजारी असल्याने दोन दुकानांना आगीीची झळ पोहोचली.
दूध तापविताना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. गंभीर होरपळलेला कामगार संतोष याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. आगीत उपाहारगृहातील साहित्य जळाले. भटारखान्यात आठ सिलिंडर होते. त्यापैकी एका सिलिंडरमधून गळती झाल्याने आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.