लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील ऊरळी कांचन परिसरात एका रोपवाटिकेत गावठी दारू तयार करण्यात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी रोपवाटिकेत छापा टाकून साडेनऊ हजार लिटर गावठी दारू, रसायन असा सहा लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी सोरतापवाडी परिसरात छापा गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून गावठी दारु, रसायन असा दोन लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी गावठी दारू तयार करणारा रोपवाटिका चालक राजेंद्र चौधरी आणि जमीन मालकाविरुद्ध ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊरळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ गावात एका रोपवाटिकेत राजेंद्र चौधरी गावठी दारू तयार करत असून, तो ओळखीतील लोकांना दारुची विक्री करत असल्याची माहिती ऊरळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने नऊ हजार लिटर, रसायन असा सहा ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आणखी वाचा-पिंपरी : बनावट नोटांची छपाई करणारी टोळी अटकेत; चीनमधून मागविला कागद

पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी परिसरात शिंदवणे गावातील कालव्याजवळ बेकायदा गावठी दारू तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून पाच हजार लिटर रसायन, ५२५ लिटर दारू असा दोन लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पाटील, उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सचिन जगताप, मनीषा कुतवळ, प्रमोद गायकवाड यांनी ही कारवाई केली.

Story img Loader