पुण्यातील सदाशिव पेठेत दोन दिवसापूर्वी एका तरुणीवर एकतर्फी प्रेम प्रकरणातून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट पोलीस चौकीमध्ये तीन कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस हवालदाराना निलंबन करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सदाशिव पेठेत दोन दिवसापूर्वी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आरोपी शंतनू जाधव याने एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तरुणी जखमी झाली, हल्लेखोरास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.पण घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट चौकीत त्यावेळी पोलिस नव्हते. या घटनेनंतर तब्बल २० मिनिटांनी पोलीस कर्मचारी पोलिस चौकीत आणि घटनास्थळी दाखल झाले.ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येताच पुण्यातील नागरिकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती, संताप व्यक्त केला होता, विरोधी पक्षांनीही टीकेची झोड उठवली होती.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवड : सामाजिक एकोपा जपण्यासाठी पोलिसाने गायले ‘विठू माऊली तू’..! हे गीत; सोशल मीडियावर व्हायरल

हेही वाचा… लाचखोरीत महसूल आणि पोलीस विभाग अव्वल! नाशिक पहिल्या तर पुणे द्वितीय स्थानावर

या सर्व घडामोडी दरम्यान पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी तिघांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune girl attack case three police constables suspended for dereliction of duty svk 88 asj