शिरुर : एसटी प्रवासात बसमधील सीटच्या खालील बॅग मधील सव्वाचार तोळ्याचे सोन्याचे दागिने , चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख ४५ हजार ५०० रु.चा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा आत्माराम लोंढे वय ६० वर्ष, व्यवसाय ,घरकाम रा. वाडाकॉलनी, शिरुर ,ता.शिरुर जि. पुणे यांनी अज्ञात चोरटाचा विरोधात फिर्याद दिली आहे .

दि. २६ फेबृवारी २०२५ रोजी दुपारी साडेबारा ते पावणेचारच्या दरम्यान केडगाव चौफुला ते शिरुर प्रितमप्रकाश नगर, दरम्यान शिरुर-चौफुला एस टी बस नं एम .एच .४० वाय- ५८१४ मधील कंडक्टर शेजारी बसलेल्या शिटखाली ठेवलेल्या बॅगमधुन अज्ञात चोरट्याने चोरी करुन चोरून नेले आहे. ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके , नाकातील १ ग्रॅमच्या दोन नथ , १८ ग्रॅम वजन्याच्या हातातील ५ अंगठ्या , १३ ग्रॅम वजानाचे गळ्यातील हाफ गंठण ,चांदीचे पैजन, छल्ला, मासोळ्या व जोडवे , दहा हजार रु रोख रक्कम असा ३,४५,५०० रु चा ऐवज चोरुन नेला . यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राउत करीत आहेत