पुणे : कृषी, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील शाश्वत विकासासाठी कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी राज्य सरकार आणि गुगल यांच्यात ‘एआय फॉर महाराष्ट्र’ सामंजस्य करार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. संपूर्ण जग तंत्रज्ञानाने चालत असून तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासन चालविणे हा अतिशय सकारात्मक बदल असल्याचा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
गुगल इंडियाच्या मुंढवा येथील कार्यालयात करण्यात आलेल्या या कराराप्रसंगी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, गुगल इंडियाचे भारतातील प्रमुख व उपाध्यक्ष संजय गुप्ता, नागपूर येथील ट्रीपल आयटीचे संचालक प्रा. डॉ. ओमप्रकाश काकडे, ॲक्सिस माय इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत एआय तंत्रज्ञान वेगाने बदलले आहे. या तंत्रज्ञानात याच वेगाने बदल अपेक्षित असल्याने त्याच्या उपयोगासाठी वेगाने पावले उचलणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कमी वेळात झालेला हा करार सकारात्मक दिशेने उचललेले पाऊल आहे. नव्या तंत्रज्ञानात लोकांचे जीवनमान बदलण्याची क्षमता असून अशा तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
सात क्षेत्रांसाठी भागीदारी
नावीन्यता आणि उद्योजकतेतील भागीदारीद्वारे गुगल राज्यातील नवउद्यमी परिसंस्थेला तसेच उद्योजकता विकासाला एआय तंत्रज्ञान पुरवून सहकार्य करणार आहे. तसेच कौशल्य प्रशिक्षण आणि शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण, नगर नियोजन, वाहतूक नियोजन अशा सात क्षेत्रांसाठी या कराराद्वारे गुगलचे सहकार्य लाभणार आहे. सरकारी सेवांमध्ये नावीन्य आणून सामान्य माणसापर्यंत सरकारी योजना प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.
“गुगलसोबत नागपुरात एआयचे उत्कृष्टता केंद्र निर्माण करीत आहोत. सात क्षेत्रांत शाश्वत विकासाच्या व्यापक भागीदारीसाठी गुगलसोबत हा करार करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे पुणे हे एआयसंदर्भात जगाच्या नकाशावर येईल.” – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री