पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला सिंहगड रस्ता पोलिसांनी हिंगणे परिसरातून अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून दोन पिस्तूल आणिचार जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

राज रवींद्र जागडे (वय २२, रा. वडगाव बुद्रूक, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जागडे सराइत गुन्हेगार आहे. हिंगणे परिसरातील कॅनोल रस्त्यावर तिघे जण थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, शिवाजी क्षीरसागर यांच्यासह पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि चार काडतूसे जप्त करण्यात आली. आरोपींनी पिस्तूल कोठून आणले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Two arrested for stealing a vehicle in Pimpri
पिंपरी: वाहन चोरी करणारे दोघे अटकेत; आठ दुचाकी जप्त
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Chandrapur Khalistan supporter arrested
मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक, अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?

हेही वाचा : पुणे: पिस्तूल बाळगणारा गुंड अटकेत, गुलटेकडीत गुन्हे शाखेची कारवाई

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे आणि पथकाने ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या गुंड सज्जन सुनील जाधव (वय १९, रा. डांगे चौक, पिंपरी, मूळ रा. रेणुशीमोरा, महाबळेश्वर, जि. सातारा) याला गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

Story img Loader