पुणे : जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून संप पुकारला आहे. या संपात पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ६० हजार कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे अध्यक्ष मारुती शिंदे यांनी केला. संघटनेच्या वतीने मध्यवर्ती शासकीय इमारतीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा : पिंपरी : तळवडे दुर्घटनेतील मृतांची संख्या ११; उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू

महाराष्ट्र शासनाने पेन्शन योजना बंद करून शासकीय कर्मचार्‍यांवर अन्याय केला आहे. जुनी पेन्शन योजना सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्ववत सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही मान्य न झालेली नाही. त्यामुळे संप पुकारल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader