पुणे : ‘विद्यापीठे, महाविद्यालयांनी गुणवत्ता, नवसंशोधनात सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यापीठे, महाविद्यालये मागे पडतील,’ असा इशारा राज्यपाल रमेश बैस यांनी दिला. अमेझॉन, अलीबाबा, फेसबुक असे आपले स्वतःचे ग्लोबल ब्रँड निर्माण झाले पाहिजेत. जगात निर्माण होत असलेल्या संधींचा फायदा घेण्याची गरज असल्याची भूमिका ही त्यांनी मांडली.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २५व्या पदवीप्रदान समारंभात बैस बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्र कुलपती डॉ. विश्वजित कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी या वेळी उपस्थित होते.
विद्यार्थी, शिक्षक अशा घटकांना मार्गदर्शन करताना बैस म्हणाले, की दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेला जपान निर्मिती क्षेत्रात अग्रणी देश झाला. तशाच प्रकारे अनेक देशांनी परिवर्तन केले. आपल्यालाही ही संधी आता मिळाली आहे. नवसंशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही संधी प्राप्त केली पाहिजे. पूर्वी आयआयटीचे विद्यार्थी परदेशात जात होते. मात्र आता गुणवंत विद्यार्थ्यांना भारतातच मोठ्या संधी मिळत आहेत. परदेशातील विद्यापीठांना भारतातील विद्यापीठांशी सहकार्य करायचे आहे, भारतात कॅम्पस सुरू करायचे आहेत. भारताविषयी जगाच्या धारणा बदलल्या आहेत. भारताचे मत जगात महत्त्वाचे ठरत आहे.
हेही वाचा…पिंपरी : समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार, चिखलीत जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी
भारताकडे चीनचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. जगातील अनेक देश कुशल मनुष्यबळासाठी भारताकडे पाहत आहेत. ही मागणी पूर्ण होण्यासाठी आपण तरुणांना कसे कौशल्य प्रशिक्षित करतो हे महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी समावेशित विकास होण्याची गरज आहे, असेही बैस यांनी नमूद केले.