पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गुरुवार पेठेतील एका वसतिगृहात ही घटना घडली. तरुणीच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आढळल्याने खडक पोलिसांकडून याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. अभिलाषा मित्तल (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुणे: जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वारजे भागातील दुर्घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा मित्तल मूळची वाशिमची आहे. गेल्या महिन्यात ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती. गुरुवार पेठेतील एका वसतिगृहात ती राहत होती. सोमवारी सकाळी अभिलाषा खोलीत एकटीच होती. तिने खोलीचा दरवाजा बंद केला. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने तिच्या मैत्रिणीने दरवाजा वाजविला. मात्र, तिने प्रतिसाद न दिल्याने संशय आला. या घटनेची माहिती खडक पोलिसांना कळविण्यात आली. खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आली. अभिलाषाच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आढळून आल्याने पोलिसांकडून याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.