पुणे : पावसाचे जोरदार आगमन झाले असून, अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पंधरा ठिकाणी झाडे काेसळली. पाषाण, सिंहगड रस्त्यावरील इमारतीतील तळमजल्यावर पाणी साचले. पुणे शहर, परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर पाणी साचले. पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला. डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, धानोरी, विमाननगर, सोलापूर, तसेच सातारा रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली. शहरातील बहुंताश रस्त्यावर पाणी साचले होते. पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला.

हेही वाचा : राज्यातील ३९ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, १० जूनपासून निवडणुकीची प्रक्रिया

शहराच्या वेगवेगळ्या भागात पंधरा ठिकाणी झाडे कोसळली. फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या फांद्या हटविल्या. पाषाण येथील बी. यू, भंडारी शोरुमच्या इमारतीत तळमजल्यावर चार फूट पाणी साचले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंपाचा वापर करून पाणी बाहेर काढले.

Story img Loader