पुणे : सिंहगड रस्त्यावरील मधुकोश सोसायटी ते प्रयेजा सिटी चौक दरम्यान गर्दीच्या वेळेत दररोज सकाळी आणि सायंकाळी जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुकोश सोसायटी, प्रयेजा सिटी परिसरात रहिवासी भाग आहे. या भागात सोसायट्या आहेत. नियोजित गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. धायरी, नऱ्हे भागात ओैद्योगिक वसाहत आहे. प्रयेजा सिटी रस्त्याचा वापर वाढला आहे. जड वाहनांमुळे गंभीर अपघातांची शक्यता असल्याने दररोज सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत वारजे सेवा रस्त्याने प्रयेजा सिटीकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

या भागातील वाहतूक विषयक तक्रारी असल्यास नागरिकांनी लेखी स्वरुपात वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय, गोल्फ क्लब रस्ता, येरवडा येथे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.